सुप्रसिध्द ज्योतिषी विजय वसंतराव भावे यांचे निधन

ठाणे (विशेष प्रतिनिधी) – जळगाव येथील राहिवासी सुप्रसिद्ध ज्योतिषी विजय वसंतराव भावे यांचे दिनांक ७ मे रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराने दुःखद निधन झाले

मृत्युसमयी त्यांचे वय ७१ होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून. मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. साप्ताहिक ठाणे नागरिकचे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सल्लागार व संपर्क प्रमुख सतीशकुमार भावे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here