नकली रेमडेसिव्हिर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगाव.महानगर तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगांव (प्रतिनिधी शेख इरफान शेख उस्मान) – अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या जळगाव.महानगर पदाधिकाऱ्यांच्यावतीने नकली रेमडेसिव्हिर इंजेक्शन बनवून काळाबाजार चार हजाराचे वर रेमडेसिव्हिर विक्री करणारा देशद्रोही पुष्कर पाखले (रा.जळगाव) व त्याच्या साथीदारांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

nivedan

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशान्वये व महानगर प्रमुख इरफान शेख यांचे नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी उपस्थित महानगर संघटक बाबा पेंनटर, महानगर सरचिटणीस रफिक शहा, महानगर चिटणीस अहेमद खान, महानगर कोषाध्यक्ष फिरोज पिंजारी, जिल्हा सल्लागार पिरजादे मेडम, जिल्हा संघटक फिरोजा बी शेख, जिल्हा संघटक पुष्पा निकम, उपाध्यक्ष जावेद खाटिक, महानगर संघटक राहुल आहिरे इतया पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here