पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – येरवडयातील कल्याणीनगर भागात चोरी करणाऱ्या महिलेस २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. तिच्या ताब्यातून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे.चोरलेल्या सोन्याचे दागिन्यां पैकी एक जोड सोन्याचे कानातील झुमके, एक सोन्याची अंगठी व चांदीची नाणी असे काढून दिले.
येरवडयातील कल्याणीनगर लेन नं. १० मधील पिकॉक पॅलेस सोसायटीत तक्रारदार संदीप कुलदिपकुमार ठुसू (वय ३३, धंदा व्यवसाय, रा. ए/२०२, पिकॉक पॅलेस लेन नं. १०, कल्याणीनगर, पुणे) यांचेकडे घर साफसफाईचे काम करणारे महिला सुनिता सचिन लष्करे (वय ३० वर्ष, धंदा-धुणेभांडी, रा.स. नं. १०, वडार वस्ती, भाजी मंडई जवळ, येरवडा, पुणे) हिने २८/०४/२०२१ रोजी सायंकाळी ०५.०० ते ०५.३० वा. चे तक्रारदार यांचे घरात सफाई काम करत असताना तक्रारदार व त्यांची पत्नी यांची नजरचुकवून त्यांचे बेडरुममधील कपाटात ठेवलेले ३,८९,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
याबाबत तक्रारदार ०८/०५/२०२१ रोजी येरवडा पोलिस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गु. रजि. नं. २४९/२०२१ भा. दं. वि. कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना महिला सुनिता सचिन लष्करे हिस ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास करता तीने तक्रारदार यांचे सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी एक जोड सोन्याचे कानातील झुमके, एक सोन्याची अंगठी व चांदीची नाणी असे काढून दिले. उर्वरित सोन्याचे दागिने खालीक सय्यद ऊर्फ बच्चू (वय ३८ वर्ष, धंदा-सोने कारागीर, रा. गल्ली नं. ३. नवाजीस पार्क, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पुणे) यास विकल्याचे सांगितले.






