कोरोनामुळे मृत्युची अफवा पसरलेल्या छोटा राजनची कोरोनावर मात

नवी दिल्ली – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यु अशी बामती पसरली होती. 7 मेला सोशल मीडियावर छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यु अशी चुकीची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र त्यावेळी तो जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा खुलासा एम्स रुग्णालयाने केला होता. अशातच छोटा राजन आता कोरोनातून बरा झाल्याची माहिती समजत आहे.

छोटा राजन याला तिहार जेल नंबर 2 मध्ये कडेकोट सुरक्ष्या व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. 22 एप्रिल रोजी छोटा राजनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. प्रकृती बिघडल्यामुळे 25 एप्रिल रोजी त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र त्याच्या मृत्युच्या बातमीने सगळीकडे त्याची चर्चा चालू झाली होती.

छोटा राजनने 16 दिवसांनी कोरोनावर मात केली आहे. राजनला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.

दरम्यान, बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय. छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here