१५ मेनंतर लॉकडाऊनचे काय? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – १५ मेपासून महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढणार आहे की आहे त्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलथा मिळणार आहे? याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. आज होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. पंरतु, समाधानाची बाब ही आहे की, राज्यात सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे वाढत्या आकडेवारीत घसरण झाली आहे.

कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या घटत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्यांही वाढलेली आहे. त्यामुळे राज्यात लाॅकडाऊन वाढणार की, नियमांमधिये शिथिलता देण्यात येणार, यासंबंधिच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत कोरोना अजूनही वाढत असल्याचेही दुसरीकडे चित्र आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊन पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्य सरकारने ५ एप्रिलला कठोर नियम लागू केले. पुन्हा १४ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने हे निर्बंध १५ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्यण घेतला. आता १५ मेनंतर राज्य सरकार काय निर्यण घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here