धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – कोरोना मुक्तीचा आभीयान शिवसैनिकांनी हातत घेऊन ब्रेक द चैन साठी कामाला लागावे असे अवाहन आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी परंडा येथील शिवसेना कार्यकर्ता बैठकीत बोलताना केले.
ब्रेक द चैन साठी ज्या ठिकाणी प्रशासन काम करीत नसेल तेथे शिवसैनिकांनो जाब विचारा जर आधिकारी ऐकत नसतील तर मला सांगा काय करायचे ते मी बघून घेईन असा इशारा आमदार सावंत यांनी दिला आहे .दि १३ मे रोजी आमदार सावंत यांनी परंडा येथील विश्राम गृह येथे परंडा , भुम ,वाशी तालूक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या वेळी ते बोलत होते .
या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत , कृषी व पशुसवंर्धन सभापती दत्ता साळूंके, जिल्हा प्रमुख गौतम लटके , प्रशांत चेडे, रामचंद्र घोगरे, सुभाषसिंह सद्दीवाल , मेघराज पाटील , श्याम मोरे , आण्णासाहेब जाधव , मकरंद जोशी , अब्बास मुजावर , रत्नकांत शिंदे ,पोपट चोबे , अशोक गरड , अप्पा गोडगे , अनिल देशमुश , दत्ता रणभोर, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते .

परंडा उप जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाना रक्त तपासणी खासगी लॅब मधुन करावी लागत असून दिड हजार रुपये खर्च येत आहे . गरीब रुग्णसाठी आर्थीक अडचणी असल्याचे तक्रारी कार्यकर्त्यांनी आमदार सावंत यांच्या कडे मांडल्याने रूग्णांची मोफत रक्ता तपासणी करून दिली जाईल कोरोनाच्या महामारीत अनेक गरीबांचे हाल होत असल्याने त्यांना मदत करणे ही आमची जबाबदारी असुन माझ्यावर कर्ज झाले तरी चालेल पण गरीब जनतेचे हाल होऊ देणार नाही असे आमदार सावंत यांनी म्हटले आहे .
परंडा उप जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी आमदार सावंत यांच्या कडून ६ लाखाचे औषध देण्यात आले या वेळी आरोग्य उप संचालक डॉ माले , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद , उप जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ पठाण , डॉ कुलकर्णी उपस्थित होते .या वेळी आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी आरोग्य उप संचालक डॉ माले यांच्याशी केली . या वेळी डॉ माले यांनी ब्रेक द चैन साठी केवळ लॉक डाऊन लाऊन कोरोना रोखता येणार नाही त्या साठी सार्वजनिक ठिकाणा सह घरात देखील मास्क वापरने गरजेचे आहे तसेच घरात जाताना हात पाय स्वच्छ धुऊन घरात प्रवेश करायला पाहिजे हे नियम काटेकोर पणे पाळल्यास कोरोना रोखन्यास मदत होईल असे या वेळी सांगीतले
सार्वजनीक ठिकाणी गर्दी होत असल्याने प्रशासन काय करीत आहे असे म्हणत आमदार सावंत प्रशासणावर भडकले व कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन आधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले अगामी जिल्हा परिषद , पंचायत समीती , नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढून जिंकणारच असा निर्धार केला .८० टक्के समाज कारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रिद वाक्य असुन त्या प्रमाणे कार्यकर्त्यांनी काम करावे असे अवाहन बैठकीत केले






