पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – कला संगम भगिनी समाज इंडिया , अनुष्का फौंडेशन व तितिक्षा कौन्सीलर्स ग्रूप यांचे एकत्रीत प्रयत्नातून ” चाळीशी +समज/ गैरसमज ” मॅनोपॉज -नक्की कसा असतो ?आनंदी कसे राहावे हया प्रश्नांची उकल करण्यासाठी सायकोथेरपिस्ट /तज्ञ समुपदेशक / वकिल / मेडिएटर ॲड . अनिशा फणसळकर यांनी कार्यशाळा घेऊन संवाद साधला .. महाराष्ट्र व बाहेरील अनेक मैत्रिणींनी उपस्थिती लावली होती .

सदर कार्यक्रम २ दिवसीय कार्यशाळा स्वरूपात होता व विनाशुल्क होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड . संध्या बागुल यांनी केले व परिचय ॲड निलिमा यांनी दिला .






