अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड जिल्ह्यातील दिव्यागं अपंग मनोरुग्ण समाज बांधव/व्यक्तींची कोरोना प्रतिबंधक लस टोचणी संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात यावी याबाबत आज लेखी निवेदन निधी चौधरी जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले.

तसेच डॉ सुहास माने.सिव्हिल सर्जन अलिबाग, अशोक दुधे जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड , साईनाथ पवार अपंग कल्याण अधिकारी रा. जि. प. यांना आज रोजी पोस्टाद्वारे निवेदन पाठवून त्याबाबत दूरध्वनी माहिती दिली आहे.

याप्रसंगी ॲड.अजय उपाध्ये . राजेश बाष्टे पत्रकार, धनंजय म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते, दिलीप जोग मा नगरसेवक, श्याम जोगळेकर सर, प्रदीप ओव्हाळ, सुरेखा बिर्जे, पूवील सुनीलकुमार आदी उपस्थित होते.






