शहादा तालुक्यातील नांदर्डे येथे कोविड १९ लसीकरण शिबीराचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) – कोरोना लसीकरण मोहिम अंतर्गत शहादा तालुक्यातील नांदर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशा अंतर्गत नांदर्डे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा नांदर्डे येथे दिनांक १२ मे रोजी कोविड १९ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

४५ वर्ष वरील वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहून करून घेतले त्या बरोबर काथर्दे, करणखेडा, वैजाली येथील नागरिकांना ही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. लस पुर्णपणे सुरक्षित असुन ४५ वर्षावरील सर्व ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे आणि कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन नांदर्डे ग्रामपंचायती कडून करण्यात आले व त्याचबरोबर शिबिराच्या आयोजना बाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला व नागरिकांचे लसीकरणा बाबत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष परिश्रम घेतले व त्यासाठी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली

यावेळी प्रकाशा आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. शेख, सिस्टर श्रीमती माधुरी ठाकरे, जितेंद्र चव्हाण, नांदर्डे येथील ग्रामसेवक श्री पावरा, सरपंच रमेश ठाकरे, करणखेडा येथील उपसरपंच श्री चुनीलाल पाटील, पोलीस पाटील आबालाल पवार, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र सुर्यवंशी शिक्षक कर्मचारी श्री कैलास गव्हाणे तसेच जि. प. शाळा करणखेडा येथील मुख्याध्यापक श्री बापू पाटील,कला शिक्षक श्री प्रशांत भामरे अंगणवाडी सेविका जयवंता ठाकरे, आशा वर्कर सलिताबाई ठाकरे या सर्वांनी लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here