मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अलीकडेच कोरोना विषाणूला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेत मोदी सरकारवर टीका करणारे अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा आपला सूर बदलला आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आता असे म्हटले आहे की, ‘काम करणार्यांकडून चुका होत असतात, बिनकामी लोकांचे आयुष्य इतरांच्या चुका शोधण्यात निघून जाते.’ अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक करणारे अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी मोदी सरकारवर टीका केली आणि म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशात जे घडत आहे त्यासाठी सरकारला जबाबदार धरणे आवश्यक आहे. पण, आता ते त्यांच्या या ट्विटची अर्थात आपल्या विधानाची सारवासारव करताना दिसत आहेत
‘इमेज’ तयार करणार्या वक्तव्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर अनुपम खेर यांनी आज आणखी एक ट्वीट केले की, “चूका केवळ काम करणार्या लोकांकडून होतात, बिनकामी लोकांचे जीवन केवळ दुसर्याच्या वाईट गोष्टी शोधण्यातच संपते.” हे ट्वीट अनुपम खेर यांच्या मागील विधानाशी जोडले जात आहे, ज्यात त्यांनी प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, अधिकाऱ्यांवरील जाहीर टीका ही ‘बऱ्याच बाबतीत कायदेशीर’ आहे.
गलती उन्हीं से होती है
जो काम करते हैं,
निकम्मों की ज़िंदगी तो
दूसरों की बुराई खोजने में ही
ख़त्म हो जाती है..:)— Anupam Kher (@AnupamPKher) May 14, 2021
बुधवारी (12 मे) एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी म्हटले होते की, “सध्या जी टीका होत आहे, ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या ज्या जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे,” असे अनुपम खेर म्हणाले. तसेच पुढे बोलताना काही ठिकाणी केंद्र सरकारने चूक केली आहे. त्यामुळे त्यांना यामध्ये जबाबदार धरायला हवे. मात्र, याच गोष्टीचे समोरच्या पक्षाने भांडवल करणेसुद्धा चुकीचे आहे, असेही शेवटी अनुपम खेर म्हणाले






