मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दहिसरमध्ये ९९०० वृक्षांची लागवड व धान्य वाटप

मुंबई (हितेश मिस्त्री) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर मधील उद्यानात 9900 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती, आमदार विनोदजी घोसाळकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात विभागातील गरजू नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जाणार आहे.


सोमवार 27 जुलै 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात केली जाणार आहे. 3300 क्षेत्रफळात 9900 वृक्षांची मियावाकी तंत्रज्ञानाने शहरी वर्गीकरण प्रकल्पाअंतर्गत लागवड केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील पाच उद्यानात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण व धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभाग प्रमुख आमदार विलास पोतनिस, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, मुंबै बँक संचालक, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर,उपविभाग प्रमुख भालचंद्र म्हात्रे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, विधानसभा प्रमुख कर्ण अमीन,शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर,महिला शाखा संघटक ज्यूडी मेंडोसा, कार्यालय प्रमुख दिलीप घुले उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here