चोपडेकरांच्या आरोग्यासाठी झटणारा एक आरोग्यदूत -“एस.बी.नाना

चोपडा (संदीप ओली) – मार्च महिन्यापासुन सुरु असलेल्या कोरोना या जागतिक महामारीने आपल्या देशात अनेक रुग्ण दगावले.कितीतरी मुले अनाथ झाली.कित्येकांचे आई-वडील,नातेवाईक वारले परंतु त्यांना या महामारीमुळे असणार्या लॉकडाऊनमुळे त्यांचे अंतिम दर्शनसुद्धा घेता आले नाही.कित्येकांचे रोजगार बुडाले.असे एक ना अनेक संकटांना प्रत्येक व्यक्ती सामोरे जात आहे.अशीच काहिशी परिस्थिती चोपडा या सातपुणड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील तालुक्याची आहे. परंतु आज येथील आरोग्यव्यवस्था आत्मनिर्भर होऊन प्रत्येक संकटाला यशस्वीपणे सामोरे जात आहे.यामधे नक्कीच स्थानिक प्रशासन,उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मंडळी,नर्स इ.चा सिंहाचा वाटा आहे.परंतु काही महिन्यापुर्वी हे सर्व सुरळीत पार पडाव व कुठल्याही रुग्णाची हेळसांड होऊ नये.त्याकरीता एक व्यक्ती तळमळीने राबली व राबत आहे ती व्यक्ती म्हणजे “एस.बी.नाना”शेतकरी कृती समितीचे संजयकुमार पाटिल हे होय.
या परिस्थातीला सामोरे जाण्याकरीता काहीतरी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता होती ती सुरुवात एस.बी.नानांनी केली.सर्वप्रथम त्यांनी स्थानिक प्रशासकिय अधिकारी,डॉक्टर्स,पत्रकार व सामाजिक संघटनेतील पदाधिकारी यांची डिजिटल माध्यमाद्वारे सभेचे आयोजन केले.त्यामधे कोरोनाशी लढतांना विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.व उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.पंकज पाटिल यांच्या सुचनेवरुन अॉक्सिजन कॉंसट्रेटर व पाईपलाईन करावी असा निर्णय घेण्यात आला.परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे वेळ मारुन नेण्यात काही उपयोग नाही हे त्यांनी ओळखले व सोशल मिडियाच्या माध्ममातुन देणगीकरीता त्यांनी जनतेला आव्हान केले व बघता बघता जवळपास 6 लाख ची मदत जमा झाली.यामधे तालुक्यातील प्रत्येक घटकाने आपले योगदान दिले.अगदी परदेशात वास्तव्य असणार्या तालुकावासियांनी सुद्धा मदत पाठवली.व अॉक्सिजनसंबंधी आपले काम पुर्णत्वास गेले.अशाप्रकारे एकएक काम पुर्ण होऊन आपली तालुक्यातील आरोग्ययंत्रणा प्रबळ झाली आहे.व चोपडा पॕटर्न संपुर्ण राज्यभर गाजतोय.याचे संपुर्ण श्रेय एस.बी.नाना यांचे आहे असे म्हटल्यास दुमत ठरणार नाही.ते म्हणतात ना कि,
कौन कहता है आसमां मे सुराख नहि होता
एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो
तसेच तहसिलदार अनिल गावित,मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर,अधिक्षक डॉ.मनोज पाटिल,डॉ.पंकज पाटिल,डॉ.गुरुप्रसाद वाघ,पोलिस उपनिरिक्षक मनोज पवार,पोलिस उपनिरिक्षक संदिप आराक तसेच या कार्यामधे त्यांना साथ देणार्या सर्वांचे योगदान ही तितकेच महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here