ठाणे कृष्णा स्नॅक्स सेंटरमार्फत गोरगरीब गरजूंना अन्नदानाचा मदतीचा हात

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – येथील कृष्णा स्नॅक्स सेंटर मार्फत हॉस्पिटल मधील पेशंट नातेवाईकांना व गरजू गरीब लोकांना मोफत जेवण वाटप करण्यात आले सदर मोफत जेवण आयोजन प्रोफाइटर गोविंद बने ,वैभव मोरे, राकेश वैद्य यांच्यामार्फत बुलंद पोलीस टाइम्स ,महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन ,महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती, स्वप्न साकार प्रतिष्ठान यांच्या मार्फत गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले.

krushna-snaks-thane

दिनांक ४ मे 20२१ पासून कोणताही खंड न पडता गरीब गरजूंना अन्नदान वाटप करत आहे अन्नदान वाटप करताना श्री सिद्धार्थ डी जाधव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालक महिला व पुरुष तसेच गोरगरीब लोकांना मोफत सॅनिटायझर ,मार्क्स ,हॅन्ड ग्लोज, फेस शील्ड मोफत वाटप करण्यात आले सदर मोफत वाटप कार्यक्रम करताना कोणती प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टन ठेवून वाटप करण्यात आले ह्या गोरगरिबांना मदत करताना स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून माणुसकीच्या दृष्टिकोनातून अन्नदान करत आहे देव जरी मंदिरात असला तरी खरा देव हा माणसाच्या माणुसकी मध्ये आहे मंदिरांना जरी टाळे असले तरी कृष्णा स्नॅक्स सेंटरचे मंदिर गोरगरिबांसाठी अन्न दानासाठी दरवाजे नेहमी 24 तास खुले असतात.

krushna-snaks-thane

हे कार्य करताना नेहमी उत्तेजन देण्याचे कार्य सिद्धार्थ जाधव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा श्री अमोल माने मुंबई अध्यक्ष यांच्याकडून नेहमी प्रोत्साहन मिळत आहे. सर्वात महत्वाचे या कोरोना महामारी मध्ये ग्राउंड लेव्हल ला काम करणारे ,गरिबीची जाण असणारे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर ती पाऊल टाकणारे ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे, सौ तृप्ती पाटील ठाणे जिल्हा अध्यक्षा, सौ प्रीती खानेकर वाहतूक जिल्हा अध्यक्षा, महिला शक्ती फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महिला अत्याचार समिती अध्यक्षा सौ शोभना ओवाळ, सुरज ओवाळ, अबोली महिला मंडळ अध्यक्ष सौ सरोज पोटफोडे यांनी महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून गोरगरिबांसाठी रात्रंदिवस झटत आहे त्यांच्या या महान कार्याला मानाचा मुजरा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here