केंद्राचे सल्लागार विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांचा राजीनामा

नवी दिल्ली – देशातील प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या समूह फोरममधून राजीनामा दिला आहे. या फोरमच्या माध्यमांतून कोरोना व्हायरसच्या विविध व्हेरिएंट्सचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली होती. कोरोना महामारीवरील केंद्रांच्या नियोजनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जमील यांनी काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले होते.

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमाल बोलत होते. वैज्ञानिकांची ही फोरम जैव प्रौद्योगिक विभागाच्या अंतर्गत येते. या मंत्रालयाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी अजूनतरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांनुसार या फोरमने केंद्राला अगोदरच कल्पना दिली होती की, मार्च महिन्यात कोरोनाचे नवे व्हैरिएंट्सचे संक्रमण वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यातून कोरोना महामारीचा वेग जास्त होईल, असं सांगण्यात आलं होतं. कोरोना विषाणुंचा व्हैरिएंट B.1.617ला दुसरी लाट येण्याला कारणीभूत मानली जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आणि देश त्याच्या दोन हात करत असताना, रोज ४ हजार लोकांचा मृत्यू होत असताना, कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेलेला असताना विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमाल यांनी आपला राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारचे कोरोना महामारीशी लढण्याची पद्धत चुकीची आहे, असे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. पहिल्यांदाच केंद्राला सल्ला देणाऱ्या शास्त्रज्ञांच्या फोरममधील एखाद्या शास्त्रज्ञाने वेगळे मत मांडले. फोरमकडून योग्य सल्ला दिला असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं, असं मत त्यांना मांडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here