लेटस रीड फाऊंडेशनतर्फे अभिनव उपक्रम : कोविड सेंटरमध्ये उभारले ग्रंथालय

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा उत्तम वापर दुसरा काय असू शकतो. याच विचारातून लेटस रीड फाऊंडेशनने व्यापक वाचक चळवळ राबविणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये एक अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. याठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचं उत्तम ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका आणि लेटस रीड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोरोना रूग्ण ताणतणावापासून मुक्त राहावेत. त्यांच्यामध्ये सकारात्मक उर्जा कायम राहावी. या उद्देशाने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.

पुस्तकांच्या निवडीवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके याठिकाणी ठेवण्यात आली आहेत. देशातला पहिला प्रयोग करण्यात आला आहे. देश कोविडमुक्त व्हावा आणि वाचनाचा संसर्ग वाढावा यासाठीचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान, आयुक्तांनी याबाबत संस्थेचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. पुस्तकांच्या निवडीचे कौतुकही त्यांनी केलं. येथील रूग्णांशी संवाद साधताना काही रूग्ण स्वत:सोबत घरून वाचण्यासाठी पुस्तकं घेऊन आल्याचंही आढळलं. त्यांच्याशीही आयुक्तांनी चर्चा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here