उल्हासनगरमध्ये धावत्या रिक्षावर कोसळले झाड, एका प्रवाशाचा जागीच मृत्यू

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह उपनगरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. उल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत.

कॅम्प 5 च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणाहून एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक भलेमोठे झाड उन्मळून या रिक्षावर पडले. त्यामुळे रिक्षातील प्रवासी यात गंभीर जखमी झाले. त्यातील लखुमल कामदार या प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर रिक्षा चालक सुनील मोरे आणि अन्य एक प्रवासी त्यामध्ये गंभीर जखमी आहे.

हे झाड विजेच्या तारांवर देखील कोसळल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. सध्या अग्निशमन दलाकडून हे झाड बाजूला करण्याचे काम सुरू असून जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here