पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही काम करत असताना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना काल दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काल त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी एक आठवड्यापूर्वीच कोरोनाची लस देखील घेतली होती.

पुण्याच्या विभागीय आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या सौरभ राव यांना मागच्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी दोन महिन्याआधी आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मागच्या शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती.

विभागीय आयुक्तांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच लस घेतल्यानंतरही एका आठवड्यात पुन्हा कोरोना झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोना व्यवस्थापनामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आल्याने सौरभ राव यांना विषाणूचा संसर्ग झालेला असू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here