लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी घरातच पोल डान्स करणे पडेल महिलेला महागात; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली – लॉकडाऊन काळामध्ये घरबसल्या लोक अनेक नवनवीन प्रयोग करत असताना पाहायला मिळत आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊन व्हिडिओ बनवत असल्याचं दिसून येत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक महिला आपल्या घरामध्ये पोल उभा करून पोल डान्स करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोल डान्स करत असताना त्या महिलेसोबत जे झालं ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. बहुतांश महिलांना नृत्याची मोठ्याप्रमाणात आवड असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच या पोल डान्स करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने एकच धुमाकूळ घातला आहे.

डान्सची आवड असलेली ही महिला आपल्या घरामध्येच पोल डान्स करत असताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पण अचानक ती पोलवर चढते आणि तो पोल घरात असलेल्या टेबलवर पडतो आणि तिची मोठी फजिती होते. मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी याला शेअर देखील केलं आहे.

ही महिला नेमकी कुठली आहे हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी तिचा पोल डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, या घटनेमध्ये ती महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा हास्यास्पद आणि गमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here