जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील पोलीस स्टेशन्स कार्यालये , मुख्य कार्यालय ग.
स .सोसायटी चे कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
आज शहर पोलीस स्टेशन, शनी पेठ पोलीस स्टेशन ,ग,स,सोसायटीचे ऑफिस, विकास डेअरी,अमर रगडा, पंचायत समिती कार्यालय चे सॅनिटायझेशन करण्यात आले, काल पोलिस अधीक्षक कार्यालय ,रामानंद पोलिस स्टेशन ,जिल्हापेठ ,शहर वाहतूक नियंत्रक कक्ष पूर्ण झाले याप्रसंगी क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील सर, शिक्षक भारतीय महिला अध्यक्ष शितल ताई जडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,हर्षाली पाटील उपस्थित होते,जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांच्याकडून जळगाव शहरातील संपूर्ण शासकीय कार्यालय ,हॉस्पिटल्स ,महत्त्वाची स्थळे ,थोड्याच दिवसांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे.
कुणाल जडे रायसोनी कॉलेज चा डिप्लोमा चा विद्यार्थी आहे, आजच्या तडफदार युवकाने या समाजकार्यात मोलाचे योगदान देत जनमत प्रतिष्ठान मार्फत या कोरोना महामारी च नायनाट करण्यात खारीचा वाटा उचलला आहे ,ही खरच कौतुकास्पद बाब आहे. त्याने स्व खर्चाने जनसेवेच्या हेतू ने हे काम हाती घेतले आहे त्यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







