कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांसाठी अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू करणार – प्रकाश गायकवाड

फलटण (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची व फलटण तालुक्या ठिकाणी असलेल्या दवाखान्यात येण्यासाठी गैरसोय होत असल्याची बाब प्रकाश गायकवाड यांच्या सहकारी मित्रांनी प्रकाश यांना सांगितल्यावर तसेच अ‍ॅब्युलन्स साठी रूग्णांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत

गरीब आणि गरजू रूग्नांची पैशावाचून हेळसांड होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी आपन समाजाच काय तरी देण लागतो हा विचार डोक्यात घेऊन व तत्वावर येत्या दोन दिवसात फलटण तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांसाठी अ‍ॅब्युलन्स सेवा सुरू करणार असल्याचे महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here