जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव व पत्रकारांना लसीकरणा वेळी प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र दिव्यांग महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार पी एम पाटील सर यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात जवळ 60 ते 70 हजार दिव्यांग बांधव असून थोड्या प्रमाणात पत्रकार बांधव आहेत अनेक वेळा लसीकरणा ठिकाणी लस पुरवठा कमी होत असल्यामुळे प्रत्येक तालुक्यात कमी पुरवठा होत आहे त्यामुळे लस घेण्यासाठी खूप गर्दी होते.नंबर लावून सुद्धा लसीकरणा अभावी लस दिली जात नाही.
सर्व दिव्यांग बांधव पत्रकार यांना आपले ओळखपत्र दाखवून प्राधान्याने लस देण्यात यावी अशी मागणी प्रदेश अध्यक्ष पी एम पाटील सर,जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन,धरणगाव तालुका अध्यक्ष संजय पाटील,महिला अध्यक्ष सौ प्रतिभा पाटील,प्रसिद्धी प्रमुख पत्रकार योगेश पी पाटील,अस्लम मणियार यांनी केली आहे.






