शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी ईडी व सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड

मुंबई (प्रतिनिधी) – बेहिशेबी मालमत्तांप्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी ईडीच्या आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी ईडी व सीबीआयने लोणावळ्यामध्ये धाडी टाकल्या आहेत.

ईडीची काडी कोणी व कशासाठी केली, हे जनतेला कळून चुकलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात परखड भूमिका मांडली आहे.  मी असल्या चौकशांनी घाबरून महाराष्ट्र हिताची जबाबदारी बाजूला ठेवणार नाही. मी लढणारा आहे आणि लढत राहणार. मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन. पण मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता असे, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटले होते.

आता ईडी आणि सीबीआय प्रताप सरनाईकांचा शोध घेत आहे. प्रताप सरनाईक बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. ईडीने आणि सीबीआयने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर धाड टाकली आहे. काहीवेळापूर्वीच दोन्ही तपास यंत्रणांचे अधिकारी या रिसॉर्टवर पोहोचले आहेत.  भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. ईडीने सरनाईकांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरु केला आहे. याआधी गेल्या वर्षी ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here