नॅशनल सिक्युरिटी गार्डचे माजी प्रमुख जे. के. दत्त यांचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड चे माजी प्रमुख जे. के. दत्त यांचं कोरोनाने निधन झालं आहे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी एनएसजी कमांडोजचं नेतृत्व जे के दत्त यांनी केलं होतं.

ज्योति कृष्णा दत्त हे 2006 ते 2009 या कालावधीत एनएसजीचे प्रमुख होते. ते सीबीआयचे सहसंचालक सुद्धा होते. ज्योति कृष्ण दत्त (आयपीएस, माजी डीजी, एनएसजी – ऑगस्ट 2006 – फेब्रुवारी 2009) यांचं 19 मे रोजी गुरुग्राममध्ये निधन झालं, असं ट्विट एनएसजीने केलं आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल एनएसजीने शोक व्यक्त केला.

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी जे के दत्त यांची ऑक्सिजन पातळी कमी होण्यास सुरुवात झाल्यावर त्यांना 14 एप्रिल रोजी गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांचं निधन झालं. दरम्यान, NSG ग्रूप कमांडर बिरेंद्र कुमार झा यांचा दिल्लीत आयसीयू बेड न मिळाल्याने मृत्यू झाला होता. रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच बिरेंद्र झा यांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here