भाजपच्या आमदाराकडून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – भारतामध्येही दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.

अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने अहमदनगरमध्ये दोन ठिकाणी 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केलेले आहे. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या याच कार्यामुळे निलेश लंके गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे.

बुलडाण्यातील चिखली विधानसभेच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी सुद्धा लंकेच्या या कामाचे कौतुक केले आहे. यावेळी श्वेता महाले यांनी स्वतः जाऊन या कोव्हिड सेंटरला भेट दिली. ‘आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचा चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत’अशा शब्दात श्वेता महाले यांनी निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक केलं. विरोधीपक्ष भाजपच्या आमदार असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here