तरुण तेजपाल यांची लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

पणजी (प्रतिनिधी प्रविण म्हापसे) – लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणारे तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता.

नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मे 2014 पासून तरुण तेजपाल जामीनावर बाहेर होते.

देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. अखेर 21 मे रोजी तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here