‘सर्व उपचार पद्धतींचा मी आदरच करतो’ – रामदेव बाबांनी मागितली माफी
नवी दिल्ली – अॅलोपॅथीला ‘फालतू विज्ञान’ म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कठोर शब्दात सुनावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.”हे विधान मी मागे घेत आहे आणि या वादावर पडदा टाकत आहे,” असे ते म्हणाले.
रामदेव बाबांनी अॅलोपॅथीला फालतू विज्ञान म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशनने नोटीस बजावली होती तर आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यावर नाराजी व्यक्त केली होती.bत्यांच्या पत्राला उत्तर देताना स्वामी रामदेव म्हणाले आहेत की “मी सर्व उपचार पद्धतींचा आदरच करतो. मी व्हॉट्सअप मेसेज वाचवून दाखवत होतो. माझे विधान संदर्भ वगळून घेण्यात आले आहे.” “कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी आपली जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले या गोष्टीचा मला आदरच आहे. “काही डॉक्टर्स देखील नॅच्युरोपॅथी आणि आयुर्वेदाला स्युडो सायन्स म्हणतात, त्यांनी देखील अशी वक्तव्य टाळावीत,” असे रामदेव बाबांनी म्हटले.
रामदेव बाबांना पत्र पाठवून डॉ. हर्ष वर्धन यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.”अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांबाबतचं तुमचं विधान देशावासियांना दुखावणारं आहे. तुम्ही केवळ कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांचा अनादर केला नाही, तर देशावासियांच्या भावनांनाही दुखावलं आहे,” असं डॉ. हर्ष वर्धन पत्रात म्हणाले आहेत.तुम्ही काल स्पष्टीकरण जारी केलं असलं, तरी ते जनतेच्या दुखावलेल्या भावनांवर मलम लावण्यास असमर्थ आहेत, असंही डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.
माननीय श्री @drharshvardhan जी आपका पत्र प्राप्त हुआ,
उसके संदर्भ में चिकित्सा पद्दतियों के संघर्ष के इस पूरे विवाद को खेदपूर्वक विराम देते हुए मैं अपना वक्तव्य वापिस लेता हूँ और यह पत्र आपको संप्रेषित कर रहा हूं- pic.twitter.com/jEAr59VtEe— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 23, 2021
याच पत्रात डॉ. हर्ष वर्धन पुढे म्हणालेत की, “मला वाटतं तुम्ही कुठल्याही मुद्द्यावरील विधान वेळ, काळ आणि परिस्थिती पाहून केलं पाहिजे. आताच्या स्थितीत असलेल्या उपचारांना तमाशा संबोधणं केवळ अॅलोपॅथीच नव्हे, तर सर्व डॉक्टरांच्या क्षमता, योग्यता आणि उद्देशावर प्रश्न उपस्थित करतं, जे योग्य नाही. तुमचं विधान डॉक्टरांचं मनोधैर्य तोडणे आणि कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत करणारं ठरू शकतं.”डॉ. हर्ष वर्धन यांनी या पत्रात शेवटी रामदेव बाबा यांना अॅलोपॅथीबाबतचं त्यांचं विधान मागे घेण्याची विनंतीही केली आहे.
संपूर्ण देशवासियों के लिए #COVID19 के खिलाफ़ दिन-रात युद्धरत डॉक्टर व अन्य स्वास्थ्यकर्मी देवतुल्य हैं।
बाबा @yogrishiramdev जी के वक्तव्य ने कोरोना योद्धाओं का निरादर कर,देशभर की भावनाओं को गहरी ठेस पहुंचाई।
मैंने उन्हें पत्र लिखकर अपना आपत्तिजनक वक्तव्य वापस लेने को कहा है। pic.twitter.com/QBXCdaRQb1
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 23, 2021
अॅलोपॅथीला ‘फालतू विज्ञान’ म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कायदेशीर नोटीस बजावली आहे. रामदेव बाबांनी सर्व डॉक्टरांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी नोटिशीद्वारे IMA ने केलीय. कोव्हिड-19 पेक्षा अॅलोपॅथीच्या उपचारांमुळे अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं रामदेव बाबा म्हणाले होते. तसंच, अॅलोपॅथीला ‘फालतू विज्ञान’ म्हणूनही त्यांनी संबोधलं होतं.
“रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्यामुळे डॉक्टरांची बदनामी झाली आणि मित्र तसेच परिवारात त्रास सहन करावा लागला,” असं आयएमएनं नोटीसमध्ये म्हटलं आहे. रामदेवबाबांवर विविध कलमांअतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथील त्यांच्या पतंजली योगपीठातील व्याख्यानात बोलताना अॅलोपॅथीला ‘स्टुपिड आणि फालतू विज्ञान’ म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त केला जातोय.






