मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – ईशान्य मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील रहिवाशी डॉ. सुहास भोसले व शिक्षिका रिता भोसले यांची कन्या रितिका सुहास भोसले हिने कॉमनवेल्थ दिवस निमित्त आयोजित पहिल्या इंडो श्रीलंका वर्चुअल कराटे चैंपियनशीप – २०२१ मध्ये १६ ते १७ वयोगटात काता या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे.
तसेच या स्पर्धेत भाग घेतलेल्या भारत व श्रीलंकाच्या एकूण २१८ खेळाडूंवर मात करीत सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू “ग्रैंड चैंपियन” हा किताब जिंकून डबल यश मिळवले. इंटरनेशनल इंडो र्यू दो फेडरेशनचे कोच फ्राज शेखसर यांच्या मार्गदर्शन खाली रितिकाने हे यश संपादन केले.






