ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दिनांक २३/५/२०२१ रोजी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात मध्ये लेडीज डब्यात स्वरक्षणार्थ लोकलग स्तीसाठी नियुक्त केलेले होते रेल्वे स्थानक विरार येथून सुटणारी अंधेरी लोकल गाडीचे जनरल डब्यात कर्तव्य करत असताना सदर डब्यातून एक महिला त्याच्या पाच लहान मुलासह प्रवास करत होत्या सदरची गाडी दिनांक 24 /5 / 2021 रोजी मीरा रोड रेल्वे स्थानक येथे फलाटावर येत असताना सदर डब्यातील प्रवास करत असलेल्या महिलेच्या पाच मुलांपैकी एक लहान मुलगा गाडीचे डब्यातून फलाटावर खाली पडला तेव्हा सदर चा मुलगा हा फलाट व गाडी चे मधील अंतरावर रेल्वे पटरी मध्ये खाली पडण्याचे अगोदरच सदर शेख होमगार्ड यांनी प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डब्यातून फलकावर उडी मारुन सदर मुलाचे प्राण वाचवले.
त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल अनेक सामाजिक संस्थेकडून शेख यांचे कौतुक करण्यात आले त्यात विशेष पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी देखील शेख यांनी केलेल्या या कार्याची दखल म्हणून एक हजार रुपयाचे बक्षीस घोषित केले तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सुद्धा त्याचा सत्कार केला परंतु हा सत्कार करताना महासमादेशक होमगार्ड मुख्यालयाकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही साधी चौकशी सुद्धा करण्यात आली नाही खूप खेदाजनक बाब आहे.

महासमादेशक मुख्यालयात सर्व सरकारी कर्मचारी अधिकारी बसून मात्र पगार घेत आहे असो काही हरकत नाही परंतु पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीमार्फत होमगार्ड शेख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे तसेच राज्य शासनामार्फत सदर होमगार्ड शेख यांना अशोक चक्रा ने सन्मानित करण्यात यावे तसेच शेख होमगार्ड यांना एखाद्या सरकारी नोकरी किंवा पोलीस भरती मध्ये प्राधान्य देण्यात यावे याबाबतचा पत्रव्यवहार गृह विभाग गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र अध्यक्ष मा श्री सिद्धार्थ डी जाधव ,श्री सतीश बनसोडे ठाणे जिल्हा अध्यक्ष होमगार्ड संघर्ष समिती यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर केले आहे तरी सर्व अत्यावश्यक होमगार्ड निष्काम सेवेमध्ये काम करत आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी हीच आशा बाळगतो आणि सर्व होमगार्ड यांनी चांगले प्रामाणिकपणे काम करत आहे याची सुद्धा महासमादेशक कार्यालयाने दखल घ्यावी हीच आमची इच्छा तरी श्री शेख होमगार्ड बांद्रा जीआरपी यांनी एका लहान मुलाचा जीव वाचल्याबद्दल समस्त महाराष्ट्र पोलीस ,गृहरक्षक दल , पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीकडून मानाचा मुजरा!






