घाबरणार नाही, झुकणार नाही, दबणार नाही!!!

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – दोन दिवसापुर्वी आमच्या आम आदमी पार्टी चे राज्य प्रवक्ते माननीय जितेंद्र भावे यांनी रूग्णाचे डिपॉझिट असलेले पैसे परत मिळावे म्हणून वोक्हार्ट हॉस्पीटल, नाशिक येथे जे अर्धनग्न आंदोलन केले त्यामुळे आरोग्यव्यवस्थेची सगळीकडे पोलखोल झालीय, कॉर्पोरेट हॉस्पीटल रूग्णांना कसे लुबाडताहेत ते यातून समोर आलेय. सामान्यांना कुणी वाली नाही का हा प्रश्न समोर उभा राहिलाय, मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पीटलवर प्रशासनाचा काही वचक उरला नाही का??

यातून जर कुणी आम आदमी ची बाजू घेवून लढत असेल तर त्याला दाबण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, कॉर्पोरेट हॉस्पीटल, प्रशासन एकत्र येवून ऑपरेशन हॉस्पीटल चे प्रणेते माननीय जितेंद्र भावे यांच्यावर केसेस टाकून घाबरवण्याचा प्रयत्न चालू झालाय. एकतर तुम्ही सरकारी आरोग्ययंत्रणा सुधारणार नाही, कॉर्पोरेट हॉस्पीटल्सच्या मोठ्या लॉबींना जनतेला लुटायला मोकळे रान उपलब्ध करून द्याल, वरून कुणी याविरूद्ध आवाज उठवला तर तुम्ही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल??

सरकारी हॉस्पीटल्स महानगरपालिकाची हॉस्पीटल, तेथील आरोग्यसुविधा यांवर अमुलाग्र बदल घडवणे अपेक्षित असतांना तुम्ही आमचाच आवाज दाबणार?? आम आदमी पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष या नात्याने मी या सर्व बाबींचा निषेध करतो आणि सर्वसामान्यांना आश्वासित करतोय की आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही, तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी लढतांना आमचे प्राण ही गेले तरी बेहत्तर परंतु, ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आता थांबणार नाही, असे आम आदमी पार्टी नाशिकचे जिल्हाध्यक्ष जयवंतकुमार महाले यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here