भाजपाच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे पंचक्रोशीत चक्रिवादळग्रस्तांना मदतीचा ओघ

परुळे बाजार , चिपी , कर्ली , किल्ले निवती , भोगवे – तेरावळे , कुशेवाडा भागातील नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप

मुंबई (विशेष रिपोर्टर संजय फाळके) – भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिटणीस माजी सभापती निलेश सामंत यांच्या सहकार्याने तोक्ते वादळामुळे परुळे पंचक्रोशीत जे नुकसान झाले त्या परिसरातील कर्ली व किल्लेनिवती येथील धुप्रतिबंधक बांधाऱ्याची पाहणी करून परुळे बाजार , चिपी , कर्ली , किल्लेनिवती ,भोगवे तेरावळे , कुशेवाडा येथील नुकसानग्रस्त गरीब कुटुंबाना आधार म्हणून ताडपत्री पत्रे/ रोख रक्कम पाण्याची टाकी, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , मच्छिमार नेते वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुस्कर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर , कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत , प्रकाश राणे ,शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे ,माजी सरपंच प्रदीप प्रभू ,आप्पा राठीवडेकर ,शेखर राणे ,गणपत माधव ,संतोष करलकर , राजू दूधवडकर ,दिगंबर केसरकर , रमेश गावडे ,विजय पाटकर , प्राजक्ता चिपकर , रक्षिता गोवेकर , दीपक दूधवडकर , आप्पा राठीवडेकर ,सुभाष घोलेकर ,कृष्णा करलकर , पांडू मांजरेकर इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here