अजित यशवंतराव यांच्या सौजन्याने आणि लांजा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोविड योध्दाचा सत्कार

मुंबई (जिल्हा प्रतिनिधी संतोष कृष्णा जाधव) – एखादा माणूस जर कोविड पॉझिटीव्ह आला तर सर्वसाधारण माणूस त्याच्यापासून दूर जातो पण अश्यावेळी आरोग्य कर्मचारी डॉक्टरांपासून ते आश्या वर्कर पर्यंत सर्व स्वतःची पर्वा न करता त्या पेशंटच्या संपर्कात येऊन त्याच्यावर सर्वतोपरी उपचार करतात अश्यावेळी त्या कर्मचाऱ्यांचे देखील मनोबल वाढले पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे अश्या भावनेतून लांजा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस ने अशा लांजा तालुक्यातील सर्व आरोग्य विभागातील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कर्तृत्ववाचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

lanja-ncp

त्यानिमित्ताने दिनांक २८ मे रोजी लांजा तालुक्यातील वाडीलिंबू प्रा.आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्गाचा सत्कार व त्यांना एक छोटीशी घरगुती वापर उपयुक्त अशी भेटवस्तू देऊन करण्यात आला. कोरोना योद्धा सत्कार केल्याबद्दल तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक कामत यांनी आभार मानले

lanja-ncp-1

त्यांच्याबरोबर दिलीप गुरव (सुपरवायझर),पायल चव्हाण (ANM), पुनस उपकेंद्राच्या सुप्रिया बोंबले, हरचे उपकेंद्राच्या मीनाक्षी वाढे तसेच सोनाली करमरकर, सई भुर्रके, रसाळ,वडपकर आणि आखाडे इत्यादी उपस्थित हेते. या प्रोत्साहनपर सत्कार कार्यक्रमाला राष्ट्रवादी वक्ता सेल जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव,लांजा तालुका कमिटी खजिनदार संजयराव खानविलकर,युवक तालुका अध्यक्ष बाबा धावणे,युवती तालुका अध्यक्ष शीतल शिंदे, युवक शहर उपाध्यक्ष किरण गुरव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here