कोरोना काळात निधन झालेल्या व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या पत्रकारांना त्वरित अर्थसहाय्य द्यावे

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – मागील दीड वर्षापासून कोरोना संकटाने अतिशय गंभीर व भयानक परीणाम केले आहेत.राज्यातील संपादक व पत्रकार कोरोनाकाळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करीत असताना त्यांचे निधन झाले आहे. अनेक पत्रकार कोरोनाने गंभीर असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधीत पत्रकारांची माहिती घेऊन त्यांना तातडीने अर्थ सहाय्य करावे अशी विनंती संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष किसन भाऊ हासे एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील काही पत्रकारांना अर्थ सहाय्य ‌जाहीर केले आहे. आपणही यासंबंधी निर्णय करून राज्यातील पत्रकारांना आधार द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here