“महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील” हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार

पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ५ जून २०२१ वार शनिवार रोजी राजस एंटरटेनमेंट व ड्रीम ऑडिओ वर्क स्टेशन जळगाव प्रस्तुत “महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील” हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या गाण्याची निर्मिती धरणगाव येथील चारुदत्त राजेंद्र पाटील (डी.जे. गोलू ) याने केली असून गीतकार व गायक नाशिक येथील प्रसिद्ध कर मन्ह लगन फेम श्री.भैय्यासाहेब मोरे यांनी गायन केले आहे संगीत जळगाव येथील श्री.जितू गायकवाड यांनी दिले आहे तसेच रेकॉर्डिंग ड्रीम ऑडिओ वर्क स्टेशन येथील चि. प्रमोद महाजन व चि. लखन हिरे यांनी केले आहे.

या गाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, विक्रम गुलाबरावजी पाटील, राजस ग्राफिक्सचे संचालक निलेश राजेंद्र पाटील धरणगाव, डायरेक्टर प्रदीप भोई जळगांव, गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन जळगाव – पाळधी, ऋषी ग्राफिक्स पाळधी व विशाल ग्राफिक्स जळगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे हे गाणे डी.जे. गोलू यांच्या Rajas Entertainment या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करण्यात येणार आहे तरी सर्व गुलाबरावजी पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी येत्या ५ जून ला नक्की गाणे ऐकावे असे गाण्याचे निर्माते डी. जे. गोलू धरणगाव यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here