कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – हुपरी शहरात वाढता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हुपरी नगरपरिषदने तात्काळ अलगिकरण कक्ष तयार करावेत अन्यथा हुपरी राष्ट्रवादी पार्टी हुपरी जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे हुपरी राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने नगराध्यक्षा सौ गाठ व मुख्याधिकारी यांना हातकणंगले राष्ट्रवादी पार्टीचे नेते माजी आमदार राजीव आवळे, माजी जीप अध्यक्ष नानासो गाठ,बाळासाहेब खैरे यांच्या प्रमुख उपस्थिती निवेदन देण्यात आले
यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख सुनील गाठ,अरविंद खेमलापुरे,पृथ्वीराज गायकवाड, शिवराज देसाई, बाहुबली गाठ,अभिजित देसाई उपस्थित होते.






