शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा मंदिर दि.५/४/२१ रोजी बंद करण्यात आले,मंदिर बंद असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांची रोजंदारी भरत नाही त्यामुळे त्यांना वेतनही मिळत नाही अशा कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे त्यामुळे साई बाबा संस्थानने मागील काळात काही प्रमाणात वेतन दिले होते या वेळीही त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून वेतन द्यावे या संदर्भात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बगाटे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य किरण बोराडे , ओबीसी मोर्चाचे स्वानंद रासने युवा मोर्चाचे शिरडी शहराध्यक्ष योगेश गोंदकर तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने गोटीराम दाढे, संदीप पवार, दत्तात्रय देवकर, अशोक लोंढे, अमोल राजूरकर आदी कर्मचारी निवेदन देताना उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.






