कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – इचलकरंजी नगरपरिषदेकडून २०१६ साली नगररचना योजना क्र.१ व २ मधील जागांसाठी मोजणी व सर्व्हेक्षण साठी सारथी इंजिनिअर्स,पुणे..यांची नेमणूक केली आहे.तरी नगररचना योजना क्र.१ व २ मधील मोजणी व सर्व्हेक्षण काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.याचा फायदा तेथील रहिवाशांना जागेवर स्वक्षेत्राची कब्जेपट्टी मिळणार आहे.
सध्या या कामांमध्ये प्रत्येक वेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी १३ जानेवारी २०२१ रोजी सहसंचालक पुणे विभागीय कार्यालयात सहसंचालक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. यावेळी सहसंचालक,पुणे अविनाश पाटील यांनी परिपूर्ण माहिती घेऊन संबंधित नगररचना विभागातील अधिकारी..नगर भूमापन अधिकारी,इचलकरंजी..यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात सल्लामसलत करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पण त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर निर्माण होणाऱ्या समस्या व कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे नगररचना योजना क्रं.१ व २ मधील काम संथगतीने सुरू आहे..
त्यामुळे शुक्रवार दि.२८ मे रोजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी उपनगराध्यक्ष दालनात नगररचना विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलविली होती. सदर आढावा बैठकीत नगररचना योजना क्रं.१ व २ मोजणी व सर्व्हेक्षण संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. पुढील कार्यवाही तत्काळ होणेसाठी पुढील आठवड्यात यासंदर्भात मुख्याधिकारी.इ.न.पा. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत नगररचना विभागातील प्रमुख अधिकारी.. जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय, कोल्हापूर..नगरभुमापन अधिकारी, इचलकरंजी.. यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम टप्प्यात अपुर्ण राहिलेले काम पुर्ण होण्यासंदर्भात अंतिम बैठक होणार आहे.
सदर बैठकीस ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश मोरबाळे, मा.नगरसेवक प्रधान माळी, नितीन कोकणे, मुख्याधिकारी.इ.न.पा. प्रदीप ठेंगल, सहाय्यक संचालक नगररचना विभाग आर.ए.पाटील, सहाय्यक नगररचनाकार.इ.न.पा. रणजिर कोरे, रचना सहाय्यक.इ.न.पा. नितीन देसाई, नगररचना योजना क्रं.१ व २ मधील प्रकाश खाडे, समीर शितोळे, तसेच सारथी इंजिनिअर्सतर्फे स्थानिक प्रतिनिधी योगेश ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.






