ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनतर्फे कलाकारांना रेशन किटचे वाटप

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आही. त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून आज (दि. ३०) ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनतर्फे कलाकारांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.

आज दुपारी 1-00 वाजता मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, घाटकोपर ईस्ट, कुर्ला ईस्ट विभागांतील कलाकारांना 100 रेशन किटचे वाटप करण्यात आले. हे रेशन किट शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.यामिनीताई जाधव यांच्यातर्फे मिळाले असून, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनच्यावतीने या किटचे वाटप करण्यात आले.

yashwant-jadhavरेशनकिट वाटपासाठी चेंबूर मधील बाळा जाधव आणि इतर सर्व सहकारी कलाकार यांनी सहकार्य केले. ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई यांच्यातर्फे शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.यामिनीताई जाधव यांच्यासह बाळा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here