अवघ्या पाच वर्षे वय असलेल्या गीत सूर्यवंशीच्या नावे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

१ मिनिटात २२० ड्रिबल्स करुन केला रेकॉर्ड; गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाण्याचे स्वप्न

भोकरदन (प्रतिनिधी संतोष पाटील) – औरंगाबाद येथील toddler’s Nursery schoolमध्ये शिकणारी अवघ्या पाच वर्षे वय असलेल्या गीत विजय सूर्यवंशी हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. गीत विजय सूर्यवंशी ही मूळची जळगाव येथील राहणारी आहे.

 

श्री स्वामी समर्थ यांच्या कृपा आशिर्वादाने बास्केटबॉल क्रिडा प्रकारात तिने दोन्ही हातात दोन बॉल पकडून अवघ्या एका मिनिटात २२० ड्रिबल्स करुन हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केले आहे. गीतचे वडील विजय गोकुळ सूर्यवंशी बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत असून, आजोबा गोकुळ सुपडू सूर्यवंशी आयकर विभागाचे रिटायर जॉईन्ट कमिशनर आहेत. या रेकॉर्डकरिता तिला आई दिपाली विजय सूर्यवंशी हिने प्रेरणा दिली असून, आजी लता गोकुळ सूर्यवंशी यांनी प्रोत्साहन दिले आहे.

geet-record-certificate

गीत दररोज औरंगाबाद येथील श्री छत्रपती कॉलेजमध्ये पंकज सर व समाधान सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून, पुढे जाऊन गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड करण्याचे तिचे स्वप्न आहे.

 

geet-record

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here