जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने शहा महाविद्यालयात ऑनलाईन तंबाखू मुक्तीची शपथ

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – दिनांक ३१ मे रोजी व्ही.पी.एम‌.एस. आर झेड शहा ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय मिठाघर रोड, मुलुंड पूर्व मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ ” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पाटील यांनी मार्गदर्शनाची सुरूवात तंबाखुमूक्तची शपथ देऊन करण्यात आली तसेच व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ( दारू, गुटखा, तंबाखू, सेगरट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखूच्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही या वर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो. तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५०० मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे. असे सांगण्यात आले आहे.

anti-tobbaco-day-poster

यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पोस्टर, व्हीडिओ, चित्रफीती व्दारे तंबाखूबद्दल जण जागृती करून तंबाखुमूक्त चे अवाहन केले. याप्रसंगी व्ही.पी.एम‌.एस. आर झेड शहा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कविता शर्मा, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयालक्ष्मी कमलराजन, प्रा. एम जी सांवत, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे लिडर दिपाली सोनावले, हर्ष सावंत आणि त्यांचे सहयोगी हर्ष मापुस्कर साक्षी पाटील यांनी उपस्थितांनाचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here