चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांच्यावतीने कलाकारांना अन्नधान्य वाटप

मुंबई (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – राज्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने वडाळा येथील पाच उद्यान या ठिकाणी अभिनेत्री नयन पवार यांनी कलाकारांना अन्नधान्याचे वाटप केले.

लॉक डाऊनमुळे राज्यात कारखाने, कंपन्या तसेच नाट्यगृह चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब, मजूर, तसेच बॅक स्टेज कलाकारांची उपासमार होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने बॅक स्टेज कलाकारांना अभिनेत्री नयन पवार यांनी अन्नधान्याचे वाटप केले.

actress-nayan-pawar

वडाळा येथील पाच उद्यान या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी समाजसेवक रत्नाकर खानविलकर व दिनेश सातपुते यांची विशेष उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here