राहुल पारखे यांच्याकडून सामाजिक उपक्रम

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – समाजाचे काहीतरी देणे लागते म्हणून राहुल पारखे व सद्गुरु मेडिकल दत्तनगर शिर्डी यांच्या 5 व्या वर्धापन दिना निमित्ताने 29 व 30 मे रोजी एक नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. 29 मे ला सकाळी साई आश्रया अनाथालय शिर्डी येथे 150 मुलांना प्रत्येकी 2 बिस्कीट पाकीट, 5 लिटर सॅनिटीझर व 10 लहान सॅनिटीझर वाटप करण्यात आले

सागर पारखे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अनाथालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 50 ते 60 शिर्डी पोलीस कर्मचारी व शिर्डी पोलिस स्टेशन वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी यांना तसेच नगरपालिका सफाई कामगार यांना प्रत्येकी व्हिटॅमिन सी विथ झिंक गोळ्या, सॅनिटीझर आणि N-95 मास्क वाटप करण्यात आले.

blood-donatation-at-shirdi30 मे रोजी सकाळी 150 ते 160 टिफिन बॉक्स पुलाव, शिरा, आणि पाणी बॉटल चे अन्नदान गोरगरिब व्यक्तींना अन्नदान वाटप करण्यात आले. सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राहुल पारखे यांनी वाढदिवसानिमित्त मित्रासोबंत साईबाबा हॉस्पिटल येथे साईनाथ रक्तपेढी येथे रक्तदान करण्यात आले.

यावेळी सद्गुरु मेडिकल राहुल पारखे, ऋषी कोते, साई कृष्णा पेट्रोल पंप, गणेश दळवी (साई आश्रया अनाथालय), अमृत गायके, सागर पेटारे, डॉ. योगेश तुरकणे, शरद अनारसे, संतोष गांगुर्डे, आकाश पेटारे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here