मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ५७ वर्ष महाराष्ट्रात व्यसनाविरोधात प्रचार, प्रसार प्रबोधन करित आहे. मंडळाचे मुख्य ध्येय मतपरिवर्तनातून व्यसनमुक्त समाज निर्माण करणे. व्यसनामुळे माणसास शारीरिक मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. दारू तंबाखू गुटखा सिगारेट या व्यसनामुळे भारतात दररोज २ हजार ५०० लोकांचा मृत्यू होत आहे. हे प्रमाण थांबवण्यासाठी या वेळी आप्पापाडा नवयुग चाळातील ७५ लोकांना कोविड १९ चे नियम पाळून तंबाखूची शपथ देण्यात आली.
व्यसनमुक्ती वर पोस्टर प्रदर्शनचे आयोजन देखील करण्यात आले. या वेळी युवा संस्थेचे सदस्या विजया बाबर तर नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे मुंबई जिल्हा संघटक दिशा कळंबे यांनी तंबाखू चे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन ही केले.






