धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – तालुक्यातील अंजनविहीरे येथे 99 लाख रुपये किमतीच्या सिमेंट बंधाऱ्याचे उद् घाटन पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
गावात नदी आहे परंतु पावसाळ्यातच तिचा उपयोग होतो त्या नंतर पाणी वाहून जाते त्यामुळे गावकर्यांच्या मागणी नुसार भाऊंनी दोन बंधारे मंजूर केले एका बंधाऱ्याचे काम सुरु आहे. बंधारे मुळे चांगल्या प्रकारे पाणी अडवले जाऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, जि प सदस्य गोपाल चौधरी, प्रभारी सभापती प्रेमराज पाटील,मा.सभापती मुकुंद नन्नवरे,प स सदस्य प्रेमराज पाटील सोनवद,दामु अप्पा पाटील,संजय पाटील सर, उपसरपंच उमेश पाटील,रवींद्र चव्हाण,विलास चव्हाण,रोहिदास पाटील,नाना पाटील,रवींद्र पाटील,विठोबा पाटील,मुरलीधर पाटील,सुरेश पाटील,केशव पाटील,शिवाजी चव्हाण,किशोर पाटील,गणेश पाटील,महेश पाटील,अनिल पाटील,पंजाबराव पाटील,रामकृष्ण पाटील,धीरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.






