मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, टँकरमधून केमिकल गळती

रत्नागिरी (प्रतिनिधी) – केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा खेडमधील भोस्ते घाटात अपघात झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावर केमिकलची गळती झाली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर झालेल्या केमिकल गळतीमुळे अनेक वाहने घसरली आहेत.

खेडमधील भोस्ते घाटात हा अपघात झाला आहे. केमिकलच्या टँकरला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे टँकरमधून केमिकलची गळती झाली. केमिकल गळतीमुळे महामार्गावर केमिकल पसरले. क्रिष्टल एसपी नावाचं हे केमिकल असल्याची माहिती पोलिसांची दिली आहे.

संध्याकाळी महामार्ग ठप्प होऊन दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. केमिकल महामार्गावर पसरल्याने सहा ते सात दुचाकी घसरल्या. सायंकाळी 5:30 वाजता हा अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरू करण्यात आली. साधारणपणे 8 च्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here