जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील नागरी हक्क संरक्षण विभागात कार्यरत असलेले ए.एस.आय. विश्वास फकिरा पाटील हे काल (दि.३१) सेवानिवृत्त झाले.
शहरातील निवृत्ती नगरातील राहिवासी असणारे विश्वास पाटील हे त्यांच्या तीन वर्षे १० महिने १७ दिवसांच्या पोलिस दलातील कारकिर्दीमध्ये अमळनेर, फैजपूर, भुसावळ येथे कार्यरत होते. सी.आय.डी., वाहतूक, क्राइम विभागात काम केल्यानंतर आता नागरी हक्क संरक्षण विभाग जळगाव येथून ते सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचे सहकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.






