बाजार सावंगी (प्रतिनिधी समीर शाह) – बाजार सावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखाना असून अडचण नसून खोळंबा अशी गत या पशुवैद्यकीय दवाखाना ची झाली आहे जिल्हा परिषद पशुवैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाजार सावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गुरांचा इलाज कोठे करावा हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना आपली गुरे दवाखान्यात पायपीट करीत मग हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे परिसरातील तीस ते पस्तीस खेड्यातील शेतकर्यांचा या पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत संपर्क येत असल्यामुळे व त्यातच पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे उपचाराअभावी आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांचे गूरे दगावली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या पशुवैद्यकीय दवाखान्याची पार वाट लागली असून यह पशुवैद्यकीय दवाखान्याचा तर खेळखंडोबा झाला आहे बाजार सावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लवकरात लवकर पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा नसता बाजार सावंगी व परिसरातील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यास कूलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.






