मुंबई (सह संपादक सुनिल गंगाधर तांबुसकर) – रविवार दि.30/5/2021 रोजी डॉ..बाबासाहेब आंबेडकरांचे आणि जेष्ठ बंधू आद.बाळाराम आंबेडकरांचे पणतू आद.सुनिल गंगाधर तांबुसकर यांनी वडाळा (पू) मुंबई येथिल पंचशिल नगर येथिल पंचशिल बुद्धविहारात करोना काळासाठी मास्क वाटप केले.
सुनिल तांबुसकरांच्या या मास्क वाटप कार्यक्रमासाठी आद.संदेश जाधव(साकेडीकर) कणकवली येथिल “भिमाई स्मारका”चे अध्यक्ष आणि संजय जाधव (सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ) यांनी रोज मुंबईतील प्रत्येक विभागात मास्क वाटप करण्यात त्यांना मदत करित आहेत. तसेच सुनिल तांबुसकरांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी असलेल्या पणतू या नातेसंबधांचा आपल्या बौद्ध समाजात परिचय करुन देत आहेत.

2021च्या करोना महामारीच्या या काळात उपरोक्त आदरणीय व्यक्ती समाजासाठी प्रत्यक्ष काही तरी कार्य कराताना ठळकपणे दिसत आहेत. हे महान कार्य सर्व महाराष्ट्रात सुनिल तांबुसकर व त्यांचे मित्र आद.संजय जाधव तसेच आद.संदेश जाधव (साकेडीकर) येणाऱ्या काळात सहजपणे करतील.







