कराड येथे अवैध दारू वाहतूक करताना एकास अटक; चार लाखाचा मुद्देमाल जप्त

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारचे दारू दुकाने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान अवैध मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतीबंधासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध दारू वाहतूक करताना एकास अटक केली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापुरचे राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप-आयुक्त वाय. एम. पवार यांचे मार्गदर्शनानुसार सातारचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांचे आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने दि.3 जून रोजी गोळेश्वर (ता.कराड) येथे अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या शंकर उत्तम सुर्वे (रा.नरसिंगपूर ता.वाळवा) याचेवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ क्र.MH-13/AC- 1745 वाहन जप्त करण्यात आले आहे. वाहनामध्ये देशी दारु संत्रच्या एकुण 384 बाटल्या सापडल्या आहेत. वाहनासह एकुण 4 लाख 23 हजार 40 रूपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे निरीक्षक राजेंद्रकुमार पाटील, उप निरीक्षक राजू खंडागळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सचिन बावकर, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी केली आहे. यापुढेही सदर बंदच्या कालावधीमध्ये अशीच कारवाई करण्यात येईल, असे विभागाचे निरीक्षक राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here