राजस्थानात पाकिस्तान सीमेवर २७० कोटी किंमतीचे हेरोईन जप्त

४ पाकिटांत ५६ किलो ६३० ग्रॅम अंमली पदार्थ; रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तस्कर फरार

नवी दिल्ली – राजस्थानात बीकानेर सीमेवर सीमा सुरक्षा दलानं (BSF) पाकिस्तानी तस्करांविरोधात मोठी कारवाई केलीय. बीएसएफच्या जवानांनी ५६ किलोहून अधिक हेरोईन जप्त केलंय. या अमली पदार्थांची किंमत तब्बल २७० कोटी रुपये असल्याचं समोर येतंय.

२-३ जून रोजी रात्री उशिरा ड्युटीवर तैनात असणाऱ्या जवानांना तारेजवळ काही हालचाल होत असल्याचा संशय आला. बीएसएफ जवांनानी शोधाशोध सुरु करत आवाजाच्या दिशेनं फायरिंग केलं. परंतु, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तस्कर पाकिस्तानकडे पळून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here