हिंगणघाट (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – उपरोक्त विषयान्वये विनंती करण्यात येते की, दिनांक 02/06/2021 रोजी फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे ला अपराध क्र. 0488/2021 कलम 376 (3), 294, 323, 506 भादंवि सहकलम 4, 5, (एल) 6, 8 पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हा दाखल होताच पो.स्टे. हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुख पो.हवा. शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी नामे विशाल उर्फ वांदुर वसंतराव उरवते वय 19 वर्षे रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट यास डीबी. पथकाने ताब्यात घेतले. सदर आरोपी याचेवर यवतमाळ, पांढरकवडा, वरोरा, नागपुर (शहर) व बुट्टीबोरी येथे अनेक चोरीचे गुन्हे दाखल असुन तो पो.स्टे. रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी व मोटरसायकल चोर असल्याने त्याची सखोल विचारपुस केली असता आरोपी विशाल उरवते याने गुन्हयात निष्पन्न झाले कि, त्याने हिंगणघाट व पांढरकवडा येथुन दोन पल्सर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून अप क्र. 488/2021 मध्ये आरोपी विशाल उरवते याचेकडुन दोन्ही मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असुन त्याचे कडुन पोलीस स्टेशनचा हिंगणघाट 1 गुन्हा व पोस्टे पांढरकवडा येथील गुन्हा उघडकीस आला आहे.
सदरची कामगिरी प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, पियुश जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. संपत चव्हाण, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोउपनि. पपिन रामटेके, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि.निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर, तसेच डी. बी. पथकाचे पोहवा विवेक बनसोड व त्यांचे पथक यांनी केली.






